दोन्ही लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.
तुमचे शब्द मात्र विशेष पटले नाहीत.
डायमेन्शन म्हणजे मिती. थ्री डायमेन्शन म्हणये त्रिमिती/त्रिमित.
मॅग्निट्यूड साठी परिमाण हे बरोबर आहे. पण परिमाण चे मॅग्निट्यूड आणि एकक असे दोन अर्थ होतात, जे संदर्भानुसार घ्यायचे असतात. ऍम्प्लिट्यूड मध्ये केवळ वाढच असते असे नाही. सर्वोच्च वा सर्वात नीच अशा बिंदूंचे मध्यरेषेपासूनचे अंतर म्हणजे ऍम्प्लिट्यूड. तो धन वा ऋण दोन्ही असू शकतो. ऍम्प्लिट्यूड साठी आयाम हा पारिभाषिक शब्द आहे. भौतिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात आयाम असाच शब्द वापरतात.
सब्साईड मध्ये एका थराखाली दुसरा थर जाणे अपेक्षित असते. त्याला विरणे कसे काय योग्य ठरेल? कोलॅप्स म्हणजे पडणे, कोसळणे.