ज्या देशांमधे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तिथे कधी कधी त्याचा जरा जास्तच फायदा घेतला जातो.

मला आठवतय की २-४ वर्षांपुर्वी बॉस्टन मधे ऐन ख्रिसमसच्या वेळेस "येशू ख्रिस्त" हा "गे" होता यावरून नाटक तयार केले होते. ते करणाऱ्या तमाम "" लोकांना तो खरोखरच "गे" होता असे वाटत होते. काही श्रद्धाळू लोकांनी त्यावर टिका केली, विरोध केला, तर काहींनी (वेडपटपणा समजून) दुर्लक्ष केले.

हे उदाहरण देयचे (आणि अशी अजूनही देऊ शकतो) कारण एव्हढेच की त्यामुळे येशू ख्रिस्ताचे महत्त्व काही कमी झाले नाही. तसेच ज्यांना रामदासांबद्दल असे बोलायचे आहे त्यांना बोलू द्या पण त्यात ते रामदासांना आणि तो इतिहास मानणाऱ्यांच्या डोक्यात नाही पण "ज्या जातीच्या" राजकारणासाठी हे करणे चालू असते, त्या "जातीतील" माणसांच्या डोक्यात मात्र नक्कीच द्वेष तयार करतात. ज्याचा झालाच तर त्यांना तोटाच आहे. (इथे मी "जात" हा शब्द उपरोधाने लिहीला आहे हे सुज्ञास सांगणे  न लगे!)

बाकी रामदास झाले काय किंवा शिवाजी झाले काय दोघेही त्यांच्या व्यक्तिविशेषा सबंधी आणि नेतृत्वाविषयी स्वयंभू होते. कोणाच्या आरत्यांवर त्यांचे तेज अथवा शिव्यांवर त्यांचे नाव अवलंबून नाही. त्याच्यावर लिहीणाऱ्या लोकांचे नाअव त्यांच्या पिढीपुरते राहीले तरी खूप!