ओशोंच्या या गोष्टई ऐवजी मी कधी काळी ज्ञानेश्वरांची आणि मुक्ताबाईची ऐकलेली गोष्ट जास्त संयुक्तिक वाटते. खरी आहे का हरदासी कथा आहे माहीत नाही, पण त्यात ज्ञानेश्वरांचे गर्वहरण आहे:

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले. मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही. ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून  "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".