शिवश्रींची मते वैयक्तिकरीत्या बहुतांशी जरी पटत नसली, तरी त्यांना आपली मते येथे मांडण्याचा अधिकार असावा, असे वाटते. तसेच, मनोगताचा उपयोग त्यांना केवळ आपल्या वैयक्तिक मतांचा प्रचार करण्याव्यतिरिक्त इतर कशासाठीही करावासा वाटत नसेल*, तर तीही त्यांची वैयक्तिक निवड असून, त्यात (प्रशासनाखेरीज) कोणी काही आक्षेप घेण्यासारखे वाटत नाही. यात कोठेही आचारसंहितेचा भंग झाल्यासारखे मला तरी वाटत नाही.

- टग्या.

(*असे त्यांना वाटत असेलसे वाटत नाही. कधीकधी कविताही लिहितात. त्या कधीकधी बऱ्याही असतात. असो.)