आम्ही मनोगत   सर्वर दुरुस्ती रजेवर जाण्या आधी दोन वेगेवेगळ्या ; थोडं खोलात गेलात तर सारखा गाभा असलेल्या बातम्यांच्या चर्चा चालू केल्या.

पहिली होती जैन साध्वी बाबत - ती बातमी वृत्तपत्रांनी पण माणुसकीचा भाग न पाहता अद्वा तद्वा शब्दात लिहिली तिथे मनोगती प्रतिसाद आले नाहीत यात काहीच नवल नाही. प्रेम,विवाह इच्छा,शरीर संबंधांची सुद्धा इच्छा कमीत कमी तरुण वयात निसर्ग सुलभ असते. काही शे वर्षांपूर्वी  ज्ञानेश्वरांच्या सन्यस्त पित्याने पुन्हा संसार केला तर समाजाने केवढा छळ केला.आज सुद्धा एका सन्यस्त स्त्रीला प्रपंच करण्याची इच्छा झाली तर केवढा कठीण मार्ग पत्करावा लागतो,आजही असंख्य तरुण विधवा आमच्या देशात पुनर्विवाह पासून वंचित असतात ,ख्रिस्चन धर्मातील ही बालपणीच नन झालेल्या स्त्रियांना तरूणपणी कधी इच्छा झाली तरी विवाह करता येत नाही.

आता खैरलांजा बातमी माझ्या सोबत वाचा .एक बाहेरगावचा 'क्ष' व्यक्ती 'य' कुटुंबा कडे येतो अस समजा की क्ष विवाहित आहे,तरी सुद्धा त्याचे 'य' कुटुंबातील स्त्रीशी विवाहबाह्य संबंध आहेत.तर संपूर्ण गावाने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकणे याचे समर्थन , आणी कायदा हातात घेऊन खुनाचे समर्थन कसे होते̱. आरोपी गावावर आधीच दंड झाला म्हणजे आरोपी ठाऊक आहेत तरी पण एक अटक होवू नये आणी प्रशासन आणि पोलिस झोपले असावेत यात पत्रकाराने बहुसंख्य गावकऱ्यांच्या जातीमुळे मिळणाऱ्या सुरक्षिततेवर  बोट ठेवले तर पत्रकाराचे चुकले कुठे? रामायणातील रामाला सीतेवरील सामाजिक संशयाचा जाच झाला नसेल हे कशा वरून? आजही २१व्या शतकात दोन व्यक्तीतील संबंधात समाज हस्तक्षेपच करत नाही तर कायदा हातात घेऊन न्याय देतो.त्या देशात आंतरजातीय विवाह सर्व सामान्य मुला मुलींना किती कठीण आहेत त्याची कल्पनाच केलेली बरी.

पा.पा.