कुमारपंतांच्या मताशी सहमत आहे... गझलेचे सगळे नियम पाळले आहेत!,
पण तरी सहजपणा अजून हवा आहे...
आणि...
नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !
इथे पहिल्या ओळीत मात्रांमधे जरा गफलत झाल्या सारखी वाटते. १ मात्रा 'जरी जन तेच' मधे....
'जुना डाव अन् जुनेच लोक' अशी केली तर?
या मताला सहमत नाही...
कुमारजी मला गल्लत वाटत नाहीये...
आपल्या 'जुना डाव अन् जुनेच लोक' या सुधारणेत एक मात्रा कमी वाटते आहे...
एकूण १६ मात्रांची ही गझल आहे आणि तुमच्या सुधारणेत १५ मात्रा दिसत आहेत...
नवा डाव हा , जरी जन तेच
ल गा गा । ल गा ल । गा ल ल । गा ल
आणि मतला असा...
कधी जायचा निघून विखार
ल गा गा । ल गा ल । गा ल ल । गा ल
चुकत असल्यास नक्की कळवावे...
सारंग