कधी कधी खूप भूक लागली असेल आणि पटकन काहीतरी चविष्ट हवे असेल, तर हाच पदार्थ वेगळ्या पद्धतीने पण बनवता येतो.

वरील सर्व डाळींची पिठे म्हणजे, १ वाटी तादंळाचे पीठ, १ मोठा चमचा डाळीचे पीठ, १ मोठा चमचा कणिक एकत्र करून जरा पातळसर भिजवून ठेवावीत. (बाकीची तयारी होऊ पर्यंत पीठ भिजते.) त्यात एक मोठा कांदा आणि थोडी कोथिबींर बारीक चिरून घालावी. नंतर लसूण, आले, ५-६ मिरच्या, जिरे, धणे, अगदी किंचित ओवा, मीठ मिक्सर मधून बारीक करून घ्या. भिजवलेल्या पीठामधे वरील मिश्रण आणि थोडे तेल घाला.

आता ह्या मिश्रणाचे नॉन स्टिक तव्यावर मध्यम जाडसर घावन घाला. थोडे खरपूस काढा. लोणचे अथवा चिंचेच्या चटणी  बरोबर छान लागते.

हा पदार्थ झटपट आणि चविष्ट होतो. करून बघा नक्की. :)