ही कटाक्षांना तुझ्या माझी विनंती;
काळजाचा वेध घेणे थांबवावे!
वा. सुंदर.
चाहुलींचा माग मी सोडून देता;
तू पुन्हा का पैंजणांना वाजवावे?
वा. छान. मला सानी मिसऱ्यात एक बदल सुचवावासा वाटतो. 'तू पुन्हा का' ऐवजी 'नेमके तू' करून बघा.
चाहुलींचा माग मी सोडून देता;
नेमके तू पैंजणांना वाजवावे!
इतर शेर थोडे थेट वाटतात. पण गझलेतील सहजता, ओघवतेपणा फार आवडला. गझल छान!
चित्तरंजन