नमस्कार सन्जोप राव!
छोट्याछोट्या गोष्टी आहेत, नवीन काहीच नाही यात परंतु तरीही लिहीत आहे.
- बागेत स्वच्छता राखणे - विशेषतः डास होऊ नये यासाठी औषधांची फवारणी, जमीनीवरील व कुंड्यांमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत आहे ना - या कडे लक्ष पुरविणे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांची योग्य ती विल्हेवाट लावणे, इ.
- सर्व प्रकारच्या वाहनांची निगा आणि वेळच्या वेळी दुरुस्ती करणे
- कदाचित अधिक जिव्हाळ्याचा विषय असेल, परंतु वाहन चालविताना हॉर्नचा कमीतकमी वापर करणे आणि वाजवीपेक्षा जास्त प्रमाणांत वाजविणाऱ्या लोकांचे प्रबोधन करणे (वेळप्रसंगी काही कठोर शब्दांचे प्रहारही आवश्यक असतात!)
- मी स्वतः फटाके अजिबात वाजवीत नाही, आणि सुदैवाने माझा मुलगा व त्याचे मित्र जे काही थोडेसे फटाके उडवतात त्याचे प्रमाणही कमी होत असून फटक्यांच्या कचऱ्याची विल्हेवाटही नीट लावली जाताना बघून पुढील पिढीविषयी काही आशादायक चित्र दिसू लागले आहे.
~ संदीप