मला काही मुद्दे मांडायचे आहेत. पटतात का पाहा.

असे अनेक मुद्दे येऊ शकतात. चर्चेत ते पुढे येतीलच. एकूणच भारतात लग्न या प्रकारात क्लिष्टता जास्त आहे. आणि हि क्लिष्टता जे कोणी लग्ना आधी अपेक्षीत करत नाहीत त्यांना लग्नाचा आणि नात्यांचा तिटकारा वाटू लागतो अन मग वेगळे होण्याकडे वाटचाल. होते जर ते सगळ्याच्याच फायद्याचे असेल तर गैर काय आहे? आणि मग त्यासाठी कायद्याची गरज काय? कायदा मध्ये येईल जेव्हा तुम्हाला दुसरा जोडीदार हवा असेल. कदाचित तो अगोदर पासून हवा असेल तर? जिथे तंटे होण्याची शक्यता आहे तिथे कायदा गरजेचा पडतो.

आता भारता बाहेर विचार करू

  • भारतात बाहेर होणारे लग्न आणि घटस्फोट
    1. अनेकदा लग्ना आधी बराच काळ, कधी कधी बऱ्याच जणां/जणीं सोबत एकत्र राहणे असते.
    2. लग्नाचे कारण मुलांना जन्म देणे आणि त्यांना कायदेशीर नाव देणे ज्या साठी आई वडील कोण आहेत हे समाजाला माहीत व्हावे.
    3. बरेच विवाह हे प्रेम विवाह असतात. पण अनेकदा हे शारीरिक असते.
    4. इथे अनेकदा कुटूंबा पेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व असते. आणि त्यात काही गैर मानले गेलेले नाही.
    5. इथे अनेकदा स्त्रिया स्वावलंबी असतात तरी सुद्धा समाज आणि कायदा स्त्रियांची जास्त मदत करतो.
    6. विवाह बाह्य संबंध हे इथल्या अनेक घटस्फोटांचे कारण असते. तर आपल्याकडे अपेक्षाभंग हे मुख्य कारण असते.
    7. अनेक पाश्चात्य देशात सरकार समाजाला अनेक सवलती देते ज्यासाठी कुटुंब असलेच पाहिजे असे काही नाही.

    अगदी खोल विचार केल्यास असे दिसून येईल की, घटस्फोट हा हिंदू समाजासाठी जास्त क्लिष्ट आहे. पाश्चात्य म्हणजे खास करून ख्रिश्चन लोक नाते वा संबंध (खास करून शारीरिक) या बद्दल खुले (खरंतर संधी साधू आहेत.), मुसलमान पुर्ण पणे पुरूशी वर्चस्व गाजवणारे आहेत जिथे कायद्याला नेहमी केराची टोपली असते. राहता राहिले हिंदू जिथे समाज शक्यतो समानतेला जास्त महत्त्व देतो. आता या वर अनेक वाद आहेत. तो मुद्दा इथे घालून विषयांतर नको. त्यांमुळे हिंदू लोक नेहमीच प्रश्नचिन्हांकित असतात या बद्दल.

    सर्वात महत्त्वाचे म्हणते आमचा देश धर्मनिरपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येकाला हवे ते करा. कायदा फक्त हिंदूंना शासन करायला त्यामुळे सर्व सामान्य हिंदू कायदा आणि समाज यांना घाबरूनच असतो. मग घटस्फोट ही तर दुधारी तलवार. मग सांगा भारतात घटस्फोटाचे खास करून कायदेशीर वेगळे होण्याचे प्रमाण कमी का बरे आहे?