१)सर्वप्रथम जाती व्यवस्थेविरोधात बंड कोणि केले.?
- माझ्या माहिती प्रमाणे जातीव्यवस्थेविरुद्ध सर्वप्रथम बंड केले ते महात्मा ज्योतीबा फुले यांनी.
२) फार पुर्वी जो ईतिहास लिहिला गेला तो कोणि लिहिला.(ज्या ईतिहासाला विद्रोही विरोध करतात तो ईतिहास)
- फार पुर्वीपासून आपल्या समाजात इतिहासच काय पण कुठलंही लिखाण , वाचन करण्याचं काम एकाच गटाने केलेलं आहे. ज्यामुळे आमची एवढी संस्कृती अधोगतीला गेली. हे काम बंधीस्त केल्या गेलं नसतं तर आपला संस्कृती प्रवाह वाहतच राहीला असता आणि निर्मळ राहिला असता.
३) विद्रोही साहित्य म्हणजे दलीत साहित्य का?
- नाही फरक आहे. दलीत साहित्यातील काही लिखाण विद्रोहीत मोडते, आणि या उलटही होतं. खरं तर विद्रोही साहित्य ही संकल्पना पुरेशी स्पष्ट आहे. अनेक हिंदू विद्रोही लिखाण करतात.
४) विद्रोही साहित्य संमेलनांत नेहमी ब्राम्हण (लोकसंख्येच्या ३ टक्के)समाजाला का लक्ष केले जाते. ?
- ज्यांना लक्ष केलं जातं ते केवळ 'ब्राम्हण' आहेत म्हणून नव्हे तर अन्यायकर्ते किंवा त्यांचा वसा चालवणारे आहेत असं मानून ह्या कृती होतात. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. कुणी कशी द्यावी हे ज्याचं त्यानं ठरवावं अर्थात यात संवैधानिक मार्गाचाच अवलंब व्हावा.
आता एक माझा प्रश्न - मी कोण ?
मी म्हणजे व्यक्तीशः मी नाही. माझी विचारसरणी.
मला आता पर्यंत समजलेला माझा धर्म मला माझ्या विवेकाशी एकनिष्ठ रहायला सांगतो. आणि स्वतःची बुद्धी गहाण टाकू नको असं सांगतो. मी जेव्हा असं वागतो तेव्हा मला माझ्या धर्मात काही दोष दिसतात. मग मी ते दुर करण्याचा प्रयत्न करतो. आणि असं जेव्हा करतो तेव्हा माझ्याकडं 'दुसरा' म्हणून पाहिल्या जातं. कदाचीत आता विद्रोही म्हणुन पाहल्या जाईल. मात्र मला माझा धर्म आवडतो. त्याच्या भल्यासाठी मी हे करीनच. आता मला हे विचारायचे आहे की मी कोण? हिंदू की विद्रोही की विद्रोही हिंदू? माझं उत्तर माझ्या जवळ आहे. मात्र सहसा असं कधी विचारल्या गेलं नाही. म्हणजेच अश्या भुमिकेवर तुम्हां सर्वांचं मत काय आहे ते मला हवंय.
नीलकांत