एकंदरित चर्चा कश्याबद्दल आहे हे मला नीट कळलेले नाही, हे आधीच कबूल करते. तरी काही प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटले म्हणून लिहिते आहे.
आज कुणीही बौद्ध बांधव स्वतःला जुन्या हिंदू जातीने संबोधताना दिसणार नाही.
मला असे लोक भेटलेले आहेत. 'आम्ही बौद्ध' असे सांगून लग्ने जुळवताना जुन्या हिंदू धर्मातील जातीनुसार (त्यातील जुळवणी तत्त्वानुसार) स्थळ पाहिल्याचे दिसले आहे.
भारतातील संपत्तीचे वितरण पाहता
तुम्ही जगातील संपत्तीचे वितरण पाहिले तरी असेच दिसेल की १० % लोकांकडे ९०% संपत्ती आहे. हा मानवी समाजाचा स्वभाव आहे. मी स्वतः कनिष्ठ मध्यमवर्गीय बाळपण अनुभवलेले आहे. तेव्हा गरीबीविषयी पूर्ण सहानुभूती ठेवून असे सांगावेसे वाटते की संपत्तीचे समान वितरण समाजात शक्य नाही. ते योग्यही नाही. तथाकथित साम्यवादी देशातही तसे घडत नाही. माणसाची जडणघडण अश्या वितरणाच्या विरुद्ध आहे. (उत्क्रांतीच्या विषयात घुसण्याचा मोह टाळते आहे.)