भारतात घटस्फोटाचे खास करून कायदेशीर वेगळे होण्याचे प्रमाण कमी का बरे आहे?
तुम्ही दिलेल्या मुद्द्यांमध्येच काही उत्तरे आहेत. उदा. अपयशाची नको इतकी भीती. कधी कधी ही इतकी तीव्र असते की जमत नसले तरी निभावून नेण्याची वृत्ती असते. परत निरूभाऊनी म्हटल्याप्रमाणे घटस्फोटित स्त्रीला समाजात तेवढा मान मिळत नाही. अर्थात स्त्रिया स्वावलंबी झाल्यापासून ह्याचे प्रमाण कमी होते आहे.
पाश्चात्य आणि आपली संस्कृती यामध्ये साम्यापेक्षा फरकच जास्त आहेत. त्यामुळे तुलनेला कितपत वाव आहे हे सांगणे कठीण आहे. आपल्याकडे लग्न म्हणजे आयुष्य सार्थक हे समीकरण फार बळकट आहे.
शेवटी हा वैयक्तिक आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. प्रभावित यांच्याशी सहमत.
हॅम्लेट