मला उमगलेली अपभ्रंशामागची कारणे  -

१. परकीय शब्द जेव्हा एखाद्या भाषेत येतात (जेव्हा त्यांचे आदान होते) तेव्हा ती भाषा, गरज असेल तिथे, आपली लकब, उच्चारांची वैशिष्ट्ये सांभाळण्याचा प्रयत्न करते. कधीकधी काही अक्षरे त्या भाषेत नसतातच. अशावेळी अशी अक्षरे असलेल्या शब्दांचा अपभ्रंश होतो.

२. कालानुरूप भाषा बदलते. उच्चार बदलतात. शब्द बदलतात. तसेच जुन्याजमान्यात शिष्टसंमत असलेले काही उच्चार गळून पडतात. शब्द अशाप्रकारे हळूहळू अपभ्रष्ट होत जातात.

३. अभिजनांची भाषा वेगळी आणि बहुजनांची भाषा वेगळी. बहुजनांच्या भाषेचा शब्दांच्या सोपीकरणाकडे असलेला कल अधिक तीव्र असतो. संस्कृत शब्द प्राकृतात असेच अपभ्रष्ट होत असावेत. अशाप्रकारे प्रसाददानाचे पसायदान झाले असावे.

तूर्तास एवढेच. चुभूद्याघ्या.

चित्तरंजन