नमस्कार,

चर्चेबद्दल आधी सांगतो. मराठी साहित्यात गेल्या काहि वर्षांपासून एक नवा प्रवाह फार जोरात वाहतो आहे आणि त्या प्रवाहातील साहित्यीकांचे वेगळे साहित्य संमेलन सुद्धा होत असते.

विद्रोही असं नाव स्वतःला लावून ते साहित्यीक स्वतःची विचारसरणी स्पष्ट सांगतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जे चुक आहे त्याचा विरोध करायचा मग ती व्यवस्था असो अथवा मुल्य. त्यासाठी कुठलाही विरोध पत्करण्याची त्यांची तयारी असते.

साधारणतः असं समजल्या जातं की विद्रोही साहित्य म्हणजे फक्त शिव्याशापच आहेत. मात्र असं नाही. अनेक विद्रोही लेखक खुप संयत भाषेत पुराव्यासहीत आपला तर्क मांडतात आणि आपला विरोध जाहिर करतात. मात्र लोकांपर्यंत पोहोचतात ते वृत्तपत्रांतील मथळे. त्यामुळे हा गैरसमज आहे.

आता तुम्ही उचललेल्या मुद्यांबाबत. हे खरं आहे की नवीन धम्म स्विकारलेल्या समाजात आजही काही भागांत उपजाती पाहण्यासारखा लज्जस्पद प्रकार घडतो. यावरून आजही समाज जागृतीचं काम खुप बाकी आहे असं मानून कार्यकर्त्यांनी कामात स्वतःला झोकून दिलं पाहीजे . पण धम्मातील ही परिस्थीती बदलेल. त्याला तसं कारणही त्या धर्मात आहे. पण माझ्या धर्माचं काय? ही परिस्थीती कधी बदलेल? आणि ही बदलावी म्हणून माझ्या धर्मपातळीहून काय काम चाललंय?

 

दुसरा प्रश्न - हा टक्केवारीचा उल्लेख मी फक्त त्या सवलती किंवा आरक्षणाच्या विरोधकांना खरी समाज परिस्थीती समजावी म्हणून करीत होतो. कुणाचीही स्वकष्टाची मिळकत ओरबाडण्याला माझा विरोध आहे.

आता जे आरक्षणाचा वाद आहे त्यात, समाजातील दुर्बल घटक तुमच्यासोबत( प्रगतवर्गासोबत) स्पर्धा करण्यासाठी केवळ तुमच्या धावपट्टीवर येण्याची मुभा मागत होता. त्याच्या साठी छोटे वर्तुळ आखले जावे अशी त्याची मागणी नाही. कारण त्याचा सगळा जिवणप्रवास या धावपट्टीपर्यंत पोहोचण्यात संपेल अशी परिस्थीती आहे.

नीलकांत