एक क्षुद्र उंदीर देवासाठी म्हणून केलेला प्रसाद त्याच्याच पिंडीवर बसून
खातो आणि तिथेच घाण करतो; या करिता देव त्या उंदराला काही शिक्षा करीत
नाही असा कसा देव? देव अस्तित्वातच नाही, देव धर्म या भाकड कथा आहेत, अशी
समजूत होवून नरेंद्र घर सोडून पळाला,
असा प्रसंग स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनात घडल्याचे वाचले आहे,
स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात असे काही वाचल्याचे आठवत नाही. स्वामी
विवेकानंदाचाही ब्राह्मो समाजाच्या प्रभावामुळे (सुरुवातीला) देवावर
विश्वास नव्हता. शिवाय स्वामी विवेकानंद घर सोडून पळून गेले होते असे वाटत
नाही. स्वामी दयानंद सरस्वती, लग्न टाळण्यासाठी घर सोडून गेल्याचा उल्लेख आहे.