याद नाई आले, देखून आले, पावसाची छिंटे पडून राहिली, उपर छत वर जातो... इ. शब्द बोलीभाषेत आहेत...

खरे आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नागपुरात बोलल्या जाणाऱ्या झाडीपट्टीतल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव चांगलाच आहे. हिंदीतली अनेक क्रियापदे ह्या बोलीत वापरतात. सोचणे, चुनणे सारखी.
बोलीभाषेची खासियत म्हणजे हिंदीतल्यासारखे 'च', 'ज' आणि 'झ' चे उच्चार. म्हणजे 'चार'मधला 'च', जगातला 'ज', आणि झिम्मातला 'झ'. 'च', 'ज' आणि 'झ' चे अन्य उच्चार ह्या बोलीत नाहीत. तसेच 'ळ'चा उच्चार हिंदीतल्या 'ड़' सारखा. हे उच्चार फार गोड वाटतात.

आता खालील वाक्ये झाडीपट्टीतले उच्चार वापरून मोठ्याने बोलून बघा-
सोचून-सोचून थकलो.
जांबुवतरावांना आम्ही चुनून दिले.
जाऊन झोप.
चांगला चमचमीत पदार्थ आहे.
सोळा सोडा प्लीज.

आनंद लुटा.
चित्तरंजन