रोहिणीताई,
खूपच छान आहेत या आठवणी... वाचून जुने दिवस आठवले..
त्या निमित्ताने माझ्याबरोबरच इतर मनोगतींच्याही दिवाळी आठवणींना उजाळा मिळाला ....
मला लहानपणी फटाके उडवायला फार भीती वाटायची.. साध्या टिकल्याही मी कधी वाजवायचे नाही... पण एकदा दिवाळीला माझी मुंबईची आत्या आली होती तिने मला पहिल्यांदा बंदुकीने टिकल्या वाजवायला शिकवल्या... मग नंतर एकेक सुट्टी लवंगी, पानपट्टी असे माझ्या भावाबहिणींच्या दृष्टीने 'फुसके' फटाके उडवायचे... भुईनळा लावताना दहा वेळा मागेपुढे व्हायचे..कारण मागून कोणीतरी सारखे ओरडायचे 'ए पेटला'
मी आणि माझ्या चुलतबहिणीत फक्त २ वर्षाचेच अंतर! त्यामुळे आमच्यात प्रत्येक गोष्टीवरून भांडण होत असे... कित्येक वर्षापर्यंत आम्ही सारखे कपडे घालायचो... जसा फ्रॉक, स्कर्ट तिला तसाच मला... आता आठवले की हसू येते...
अंजू