नागपुरातल्या मराठीतल्या हिंदी शब्दांचं तरी कशाला, काही मराठी शब्दांचे अर्थसुद्धा कधीकधी (पुण्यामुंबईपेक्षा) वेगळे होतात.

एका नागपुरी मित्राला कशाचातरी पत्ता विचारला असता ते ठिकाण अमूक‌अमूक दुकानाच्या 'खूप समोर' आहे असं उत्तर मिळालं. हे 'खूप समोर'चं कोडं उलगडेना! '(अमक्यातमक्या ठिकाणाच्या) समोर' म्हणजे (पुण्यामुंबईकडे) जर facing opposite (अर्थात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला), तर 'खूप समोर' म्हणजे काय? त्याच (X किंवा Y) coordinateवर पण चारपाच समांतर रस्ते सोडून??? कळेना! शेवटी उलगडा झाला की त्याला 'खूप पुढे' म्हणायचं होतं. (म्हणजे 'त्या दुकानापासून त्याच रस्त्यावर पुढे चालत जा, खूप चालल्यावर सापडेल' अशा अर्थी!)

- टग्या.