"त्याला लगेच त्याच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्याने आपली टोपी जमिनीवर फेकली."
हे पाहून वर बसलेल्या माकडांपैकी एक पुढारी-छाप माकड सरसर करीत खाली आले आणी टोपीवाल्याने टाकलेली टोपी उचलून तितक्याच चपळतेने परत झाडावर जाउन बसले. हे पाहून टोपीवाला वैतागला व म्हणला - 'अरे, माझ्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार तुम्ही सगळ्यांनी आपापल्या टोप्या खाली फेकायला पाहिजेत!'
त्यासरशी तो माकडांचा 'नेता' खो-खो हसू लागला - 'च्या.... काय तुला एकट्यालाच आजोबा होते की काय, आँ??!'
हिरमुसलेला टोपीवाला मुकाट्पणे घरी गेला व त्याने टोप्या विकण्याचे सोडून राजकारणात प्रवेश केला. काही काळाने त्याने राज्याचे मुख्यमंत्रीपद बळकावले व पहिले काम केले ते माकडांना पोलिसांपासून अभय देण्याचे. अश्या प्रकारे अनेक वर्षे सत्ता भोगून अब्जाधीश झाल्यावर त्याने संन्यास घेतला.
अशी ही साठा उत्तरांची कहाणी...
:-]