मी दिलेला दुवा आपण वाचलात का? अश्या कित्येक घटना घडत असतात. प्रत्येक घटनेला जात-पातीचे निकष लावत राहिलो तर घटनेबद्दल काही करायचे सोडून आपण त्यातील न्याय-अन्यायांशी संबंधित (निष्फळ) वादच घालत बसू.
महाराष्ट्रासारख्या "पुरोगामी" राज्यात असा प्रसंग घडल्यावर त्याची बातमी विस्ताराने देणे आवश्यकच आहे.
आणी 'पुरोगामी' म्हणलात तर जी राज्ये 'पुरोगामी' नाहीत त्यांना असे करण्यास सूट? हा कोठला न्याय?
कोणाच्याही विरुद्ध अश्या घटना घडता काम नयेत - 'सवर्ण', दलित, हिंदू, मुसलमान, क्रिस्चियन... आपण याच्याशी तरी सहमत आहात का?
अ. ना.