बातमी वाचली, झालेला प्रकार आमानवी आणि निंदनीय आहे.
दलित कुटुंबाला बहुजन गावकऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने ठार केले असे त्या वृत्तातून समजले. घटनेच्या पार्श्वभूमीवर खालील वाक्ये लेखकाची मते दाखवतात असे वाटल्याने मूळ बातमीतून जशीच्या तशी उतरवली आहेत.
डॉ. आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताने भलेही म. ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानले पण, म. फुलेंच्या बहुजनांनी आंबेडकरांना कितपत स्वीकारले, असा प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो.
बहुजनहिताच्या मंडल आयोगासाठी आणि त्यानंतरही ओबीसी-बीसी आरक्षण लढ्यासाठीही दलित कार्यकर्ते मैदानात आले आहेत. बहुजनांच्या संघटना त्यात चवीपुरत्याच होत्या. हा या दोन समाजवर्गातील दुभंग कुणी लक्षातच घेत नाही. आपल्यालाही आरक्षणाचे लाभ मिळणार, हा आपमतलबीपणाचा प्रकाश आता कुठे शहरी बहुजनांच्या डोक्यात पडू लागल्याने आंबेडकरांविषयी कळवळा नाही म्हणायला डोकावू लागला आहे पण, दुभंग मात्र कायमच!
एकूणच लेखकाचा बहुजन समाजाकडून दलित बांधवांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी असंतोष दिसतो आहे.