"पुरोगामी" हे उपरोधाने म्हटले होते. त्यामुळे त्याला दुहेरी अवतरण घातले आहे.
प्रत्येक घटनेला जातपातीचे निकष लावणे चूक आहे पण ही घटना घडण्याचे कारणच जर विशिष्ट जात असेल तर ते विस्ताराने लिहिले तर बिघडले कुठे?
जर ही गोष्ट निव्वळ एक "खून" अशीच असती तर जात लिहिणे चुकीचे होते. पण गावकऱ्यांनी एकत्र येऊन बहिष्कार घालणे आणि नंतर हत्या करणे या गोष्टी अधिक गंभीरपणे घेणे आवश्यक आहे.
शिवाय मला एक कळले नाही की किती दलीत पुढाऱ्यांनी या बातमीचा आणि पुढे न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा केलाय?
अनिल अवचट, बाबा आढावांसारखे अनेक लोक आणि दलितांच्या संघटना अशा प्रकरणांचा पुरेसा पाठपुरावा करतात. प्रसारमाध्यमे याला प्रसिद्धी देत नाहीत.
कोणाच्याही विरुद्ध अश्या घटना घडता काम नयेत - 'सवर्ण', दलित, हिंदू, मुसलमान, क्रिस्चियन... आपण याच्याशी तरी सहमत आहात का?
संपूर्ण सहमत आहे.
येथे "तरी" हा शब्द खटकला :(