येथे "तरी" हा शब्द खटकला :(

आपण आधी 'असहमत' म्हणल्यामुळे आपली विचारसरणी (ट्रेन ऑफ थॉट्स - प्रतिशब्द?) मला कळली नव्हती, म्हणून ही विचारणा. यात आपणास उपरोधिक बोलायचे नव्हते.

पुन्हा वाचल्यावर हा शब्द थोडासा विसंवादी वाटतो खरा. क्षमस्व.

मूळ बातमी जर संपादकीय किंवा प्रति-संपादकीय (ऑप-एड - प्रतिशब्द?) या स्वरूपाची असती तर लेखकाने लावलेला त्यातील सूर मी समजू शकलो असतो. पत्रकाराने बातम्या देताना आपली मते त्यात घुसवू नये असे माझे (नम्र) मत आहे. मतप्रदर्शनासाठी (एडिटोरियलायझिंग - पुन्हा एकदा प्रतिशब्द?) वर्तमानपत्रात वेगळे स्तंभ असतात. त्याचा वापर करावा. 

चू. भू. द्या. घ्या.

अ. ना.