ही बातमी कितीही घृणास्पद असली तरी ती छापली ते चांगले झाले. त्या मूळ बातमीत मला विशेष जातीय रंग ही वाटला नाही. आणि संपूर्ण गावाला कडक शिक्षा झाली पाहीजे असे माझे मत आहे.

पण आता या बातमी संदर्भात एक विचार करा: हेच जेंव्हा हिंदू - मुसलमान यांच्यात काही गुन्हेगारी प्रकरण होते, तेंव्हा (विशेष करून मुसलमानी हल्ला होतो), तेंव्हा प्रसार माध्यमे लिहीणार की "एका धर्मातील लोकांनी दुसऱ्या धर्मातील लोकांवर हल्ला केला.. वगैरे", पण हेच जेंव्हा हिंदू धर्मात होते तेंव्हा जातीनिशी दिले जाते. पहील्या प्रकारात सामाजीक तणाव होउ नये याची काळजी असते, तर मग दुसऱ्या बातमीमधे काय इच्छा असते?