हिंदू-मुसलमान दंगलींमध्ये कोणाच्याही विरोधात बातमी लिहिली तर दुसरा समाज तात्काळ प्रतिहल्ला (प्रतिकार?) करतो.
बहुधा दलित समाज हिंसक प्रतिक्रिया व्यक्त करणारच नाही अशी प्रसारमाध्यमांची खात्री असावी.
दंगलींसारख्या प्रकरणात सामान्यपणे व्यक्तीसमूहाचे नाव दिले जात नाही, पण गोध्राकांड किंवा राधाबाई चाळ जळीत प्रकरण (जेथे विशिष्ट समूहाच्या व्यक्तींचे कॉर्नरिंग केले आहे) तेथे बहुतेक वृत्तपत्रांनी अन्याय करणारे आणि अन्यायपीडित यांचे जात धर्म स्पष्टपणे सांगितले आहेत
नुकतेच भिवंडीमध्ये झालेल्या पोलिसांच्या हत्येच्या वृत्तात हत्या करणारे मुसलमान होते हे स्पष्टपणे वाचल्याचे आठवते.