इथे सर्वत्र भाजणी मिळत नाही, पण ह्युस्टनमधल्या एका दुकानात मिळते असे ऐकून आहे.
माझी एक अमेरिकेत रहाणारी भारतीय मैत्रीण मला म्हणाली होती की कॉफी ग्राईंडर मध्ये ती भाजणीसाठी भाजलेली धान्ये दळते. मी तिने केलेली भाजणी कधी पाहिली वा खाल्ली नसल्याने ती भारतातल्या भाजणीप्रमाणेच अगदी होते का वगैरे सांगू शकत नाही, पण होत असावी असे वाटते. मीही कधी करून बघण्याचा विचार करते आहे.