एकूणच दलित समाजाची ताकद विभागली गेली आहे. कुचकामी रिपाई नेतृत्व त्यामुळे आंबेडकरी समाज विभागला गेला .रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर ,नामदेव ढसाळ, आणि इतर गटा तटांमुळे समाज दुभंगला,तिभंगला...
आज रामदास आठवले राष्ट्रवादी कॉ.बरोबर,नामदेव ढसाळ शिवसेनेबरोबर,,प्रकाश आंबेडकर सोयीनुसार युती करतात.काय बोलणार
आंबेडकऱी चळवळ संपवली ह्यांनी की ह्यांच्या राजकारणाला कंटाळुन आपोआपच संपली असे वाटते.
रामदास आठवले कडे पाहून कोणाला वाटेल का पक्षात येण्यास . प्रकाश आंबेडकर विदर्भात (अकोला जिल्हा) असतात.नामदेव ढसाळ केव्हातरी दै.सामनात लिहीतात. काय करायचे समाज दिशाहीन झाला का.परत एकदा दलित पँथर ( स्थापन झाल्यावर लगेच दोन तीन वर्षात फुट पडली)ची गरज आहे का? आपणास काय वाटते.
फुटीचा महाभयानक शाप (वेगळ्या अर्थाने). नुकतीच फुट पडली सम्राट नावाच्या दैनिकात .दोन शकले झाली .१)वृत्तरत्न सम्राट २)शासन सम्राट
जे उत्तर प्रदेशात कांशिराम ,मायावती यांनी केले ते महाराष्ट्रात होऊ शकते का
सांगा जरा.