मराठी माणसाने आपल्या सुखाच्या कल्पना एका परिघात सिमीत केल्या आहेत. वरील काही  प्रतिसादात त्या व्यक्त झाल्या आहेतच. त्या तशा करायच्या काही कारणेही वर आली आहेतच.  माझ्या मते भविष्याच्या चिंता करत मराठी मनुष्य कमीत कमी जोखीमेचे (risk)असलेला पर्याय स्विकारत जातो आणि मग व्यवसायाकडे पाठ फ़िरवण्याची वृत्ती अधिक बळावत जाते.असे दुष्टचक्र असल्याने मराठी माणसे उद्योगात जात नाहीत असे मला वाटते.