बर्डीवरच्या पातळ गल्लीत पकोडेवाल्याकडे पकोडे छान भेटतात.
अहाहा, वाव्वा, खरेच. तसे मुगाचे 'पकोडे' पुण्यात खरेच 'मिळाले' तरी 'भेटणे' शक्य नाही. वाव्वा. ते दुकान मेन रोडवर असल्यापासून मी तिथे जातो आहे. सायकलवरून कॉटन मार्केटात जायचे. भाजी घेऊन झाली की येताना काही पैसे " "वाचवून" मी ह्या पकोड्यांना भेटायला जायचो. (इथे मुगाची भजी मिळतात. नागपुरात ब्रेडच्या तुकड्यांध्ये मसाला टाकून तयार करतात त्या ब्रेड पकोड्याला पॅटिस म्हणतात. समोस्याला सामोसा म्हणतात. असो.)
मी उद्या पोचतो आहे नागपुरात. सराफ्यातली पाणीपुरी, तुम्ही म्हणता ते पकोडे, रेड्डीकडचा उपमा, वीरस्वामीचा दोसा, नागपूर सावजीची कलेजी सगळ्यांना भेटायचे आहे.
चित्तरंजन
मंजुषाताई, लेख गीता सप्रे ह्यांचे आहेत. मी केवळ टंकलेखनाचे काम केले हे पुन्हा सांगावेसे वाटते.