पाकिस्तानमधून भाडोत्री तालिबानी नरपशू आयात करतात ते वरील उदाहरणातील चोर दरोडेखोर. काश्मिरी लोक नाहीत. तसेच वैमनस्याचा फायदा घेऊन तरुणांना पाकी सीमेपलिकडे नेऊन दहशतवादी कृत्याचे प्रशिक्षण देणे हे बाहेरच्यांचेच काम आहे. अतिरेक्यांना शस्त्रे, पैसा पुरवणे हे बाहेरचे चोर दरोडेखोरच करत आहेत. (viz. पाक सैन्य, तालिबान, अरब देश वगैरे वगैरे इस्लामी पिलावळ).
विमान अपहरण, भारतीय वकिलाचे अपहरण आणि हत्या, संसदेवर हल्ला हे सगळे प्रकार स्थानिक कश्मीरींच्या असंतोषाचे उद्रेक आहे असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहे.
पुन्हा एकदा.
१. काश्मीरमधून हिंदूंना हाकलून द्यायचे आणि मग काश्मीर मुस्लिमांचे आहे म्हणून पाकमधे विलीन करा वा वेगळे स्वतंत्र करा असा कांगावा करायचा हा नीचपणा, दुटप्पीपणा आहे.
२. ३७० कलम वापरुन कृत्रीमरित्या काश्मीर वेगळा ठेवला आहे. तसे तिथल्या जनतेने मागितले होते. त्यामुळे आता वेगळे आहोतच मग फुटून का निघू नये असे म्हणणे दुटप्पीपणा आहे. कुणीतरी पुढाकार घेऊन हे कलम रद्द केले तर काही वर्षात उद्योग धंदे फोफावतील आणि हा भाग भारताच्या अन्य राज्यांप्रमाणे बनेल.
कुण्या उन्मत्त सैनिकी अधिकार्याने अत्याचार केले म्हणून समस्त भारत सरकार वाईट असे कुणी म्हणू नये. त्या अधिकार्याला शासन झालेच पाहिजे.
तसे तर काश्मीरचा मुद्दा घेऊन अतिरेक्यांनी अमाप अत्याचार केले आहेतच की. म्हणून काय सगळे काश्मिरी वाईट म्हणायचे का?
पूर्वेकडील समस्त छोटी राज्ये फुटून निघायला उत्सुक आहेत हे उघड आहे. पद्धतशीरपणे बांगलादेशातून मुस्लिम घुसखोरी करुन, ख्रिस्तीकरण करुन वगैरे लोकांना फुटीरतेचे बाळकडू पाजले गेले आहे. आणि सरकारने विशेषतः काँग्रेसने व कम्युनिस्टांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
पण केवळ ही छोटी राज्ये स्वतंत्र बनल्याने समस्या संपत नाही. उलट सुरु होते. पाणी, सीमा, वाहतूक ह्या मुद्द्यावरून अमाप रक्तपात, युद्ध होऊन सगळा भारत अस्थिर बनेल. आपले समस्त प्रेमळ शेजारी देश ह्या आगीवर आपली पोळी भाजून घेतील. हे सगळे आपल्याला वसुधैव कुटुंबकम् ह्या तत्त्वाखाली गोड मानून घ्यायचे असेल तर घ्या बापडे. माझा ह्याला सक्त विरोध आहे.