माझे मत -  श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर फार कमी आहे. ज्याला आपण भोंदूगिरी समजतो ते एखाद्यासाठी श्रद्धास्थान असू शकते, त्यामुळे हा एक वैयक्तिक प्रश्न आहे असेच आपण मानावयाला हवे.

राहाता राहिला प्रश्न, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सत्यसाईबाबांचे दर्शन घेतले' - एक बातमी.

हे दर्शन जर त्यांनी सरकारी अधिकारी म्हणून जर घेतले असेल तर त्यासंबंधी मार्गदर्शक नियम, तत्त्वे आहेत. त्यात ते जर बसत नसेल तर , कोणीही असो, ते मान्य करणारच नाही, निदान विरोधी पक्षतरी. पण त्यांनी जर ते खाजगी बाब म्हणून केलं असेल तर आपण काय करणार? बातमी छापणाऱ्याचाच तो दोष आहे, असेच म्हटले पाहीजे.

याच नियमांचा आधार घेऊन दरवर्षी पंढरपूरच्या पांडूरंगाची पूजा केली जाते. ते आपण काय म्हणणार? - पुरोगामी कि आणखी काही?

याला उपाय एकच - पुढची बातमी वाचणे.  हे सर्व प्रकार काळाच्या ओघात निघूनच जातात. (पूर्वी चंद्रास्वामी नावाचे प्रस्थ फार होतं. आता ते कुठे आहेत? स्वामिजी नक्की आहेत, पण भक्तगण आता दुसरीकडे गेले)

प्रसाद.