माझा मुक्काम सद्ध्या वानवडीलाच आहे. शिंदे महाराजांची छत्री म्हणजेच हे स्मारक चांगल्या स्थितीत आहे. सकाळ, दुपार,संध्याकाळ बरेच वेळा मी भटकत इथे येतो. कधीपासून या वास्तूची रेखाचित्रे काढण्याचे मनात आहे पण अजून योग आलेला नाही. छत्रीपासून थोडे पुढे गेल्यावर नेम्बा मारुती मंदीर आहे. ( नेम्बा चा संदर्भ अजून लागलेला नाही) हा सारा परिसर वाहनांची वर्दळ कमी असल्याने तसा शांत आहे. वानवडीचा चेहरामोहरा फार वेगाने बदलत आहे. गेल्या एका वर्षात मी टपऱ्यांची हाटेलं होताना, जुन्या चाळी इमारती जाऊन मोठमोठ्या टाऊनशीप होताना पाहतो आहे. आयटी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या हडपसरच्या आसपास आपले बस्तान बसवत असताना त्यांतील कर्मचाऱ्यांकरता वानवडीचा परिसर शहरी सुविधा आणि सोबत शांतता असल्याने सद्ध्या मुख आकर्षणाचा आहे.

महेश, तुम्ही म्हणता तशी कोणत्या ढोलाची अजून मला कल्पना नाही. पुढच्यावेळी पाहून, खात्री करून इथे कळवेन.