परप्रांतीय महापौर ?? ह्या वेळचं नक्की माहीत नाही, परंतु अजून १० वर्षात मुंबईत सत्ता ही संपूर्णपणे भैय्यांच्याच हाती असेल. आज मुंबईच्या रस्त्यांवर ज्याप्रमाणात भैय्ये दिसतात, आणि ज्याप्रमाणात रोजच्यारोज ह्या लोंढ्यांमध्ये भर पडते आहे, त्यावरून मुंबई आणि मराठी माणसाचे मुंबईतील भवितव्य हा विषय काही वर्षांनी भूतकाळात जमा झाला असेल. पुण्या-नाशिकातील मराठी माणूस हा नवीन विषय तेंव्हा आपण चघळत असू.

राहिला प्रश्न शिवसेनेचा. गेल्या काहीवर्षात, शिवसेनेने, मुंबई आणि मराठी माणसाची जी वाट लावली आहे त्याला तोड नाही. मुंबईच्या आजच्या परिस्थीला जर कोणी जवाबदार असेल तर ती शिवसेनाच. ह्यांच्याच हातात गेले १०-१५ वर्ष पालिकेची आणी ५ वर्ष महाराष्ट्राची सत्ता होती. ५ वर्षात महाराष्ट्राला तर मागे नेलेच, पण मुंबईही विकून खाल्ली. भैय्ये आधीही मुंबईत येतच होते, पण, बाळ ठाकरेच्या मोफतं घरांच्या योजनेमुळे, त्यात अधिक भर पडली. मुंबईच्या विकासासाठी काहीही योजना शिवसेनेकडे कधी नव्हत्या आणि आजही नाहीत. महानगरपालिकेच्या निवडणूंकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या भाषणांचे मुद्दे, भारत पाकिस्तान क्रिकेट सामने, सोनिया गांधीचा विदेशीचा मुद्दा, हिंदुत्व वगैरे वगैरे .. ह्या मुद्द्यांचा आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा नक्की काय संबंध आहे ?

मुंबईत पाण्याची टंचाई आहे. रस्त्यांची वाट लागली आहे, मोकळ्या जागा बिल्डर आणि भैय्ये बळकावत आहेत. आणि हे सर्वकाही भ्रष्ट पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शिवसेनेच्याच आशीर्वादाने गेली कित्येक वर्ष चालू आहे. उद्या जरी शिवसेना हरली तरी त्यांने जास्त काही फरक पडेल असे वाटत नाही. कारण सत्तेत असूनही त्यांनी मुंबईला फारसे काही दिले नाही. मातोश्रीचे मात्र "रिनोवेशन" झाले. सायकलची लायकी नसलेल्या नगरसेवकांकडे छानपैकी गाड्या आल्यात. ह्यात मराठीमाणूस सोडाच, शिवसेनेची नाड सामान्य शिवसैनिकांशीही तुटली. ह्यांनी दादरच्या मराठी फेरीवाला हटवण्यासाठी आकाशपाताळ एक केलं होत, पण मुंबईच्या प्रत्येक स्थानका बाहेर हजारोनी बसलेल्या भैय्यांना हात लावला नाही. आज  शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरेनेही, गुजराथ्यांसाठी एका मराठी माणसाचा जीव घेतलाच होता की.

शिवसेनेच मराठीबद्दलचे प्रेम आणि अगदी हिंदुत्वही कित्ती बेगडी आहे हे सांगायची गरज नाही. आज ज्याकाळात, मुंबईतील मराठी वाचवण्यासाठी मुंबईत "भैय्या हटावं" ची हाक देण्याची गरज होती, त्याकाळात शिवसेनेने आणि "ठाकरे परिवाराने" स्वतः:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी मराठी माणसामध्येच फूट पाडली आहे. आणी मूर्खासारखे आपणही हिंदुत्व, शिवसेना,मानसे सारख्या फसाव्या गोष्टींना बळी पडतो आहोत.

मराठी माणसाला शिवसेनेची असलेली गरच कधीच संपली होती. गरज शिवसेनेला मराठी माणसांची आहे. ह्या निवडणूकीत तोंडावर आपटल्यावर ह्याची जाणीव शिवसेनेला होईल. पण त्याला फारच उशीर झालेला असेल. भैय्ये शिवसेनेला भीक घालणार नाहीत, आणि ज्या मराठीच्या नावाने कारभार केला तो मराठी मुंबईत अल्पसंख्य असेल. बहुदा हे ओळखूनच राज ठाकरेचा पक्ष "सेक्युलर" झालाय. पण त्यांचाही छुपा अजेंडा, "सावकाश घ्या .. सगळ्यांना मिळेल" हाच आहे.

आजच्या घडीला, मुंबईत मराठी टिकवायची असेल, तर ते काम प्रत्येक मराठी माणसाला करावे लागेल. आजही पालिकेत आणि सरकारी यंत्रणेत बहुसंख्या मराठीच आहेत. परप्रांतीयांचे बहुतेक सर्व व्यवहार हे बेकायदेशीररीत्या चालू आहेत, अगदी झोपड्यांपासून ते, मुंबईत प्रमाणाबाहेर वाढलेल्या रिक्शा, कोपऱ्या-कोपऱ्यांवर असलेले पानवाले, भाजीवाले, भेळपुरीवाले, ते मोठमोठ्या जागा बळकावणारे बिल्डर्स, हे सगळे बेकायदेशीरच आहे आणि कायद्यानेच त्यावर अंकुश आणता येण्यासारखा आहे. त्यांसाठी ठाकरेच्या "मुंबईत यायला लायसन्स हवे" असल्या काल्पनिक आणि फसाव्या योजनांची गरज नाही. आपणच पुढे येऊन, आपल्या आजूबाजूला असलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, वस्त्यांची तक्रार पालिकेत केली पाहिजे, त्या हटविण्यासाठी त्यांच्यावर आणि नगरसेवकांवर दबाव निर्माण केला पाहिजे. जेणे करून "मुंबईत आधीसारखं आजकाल चालत नाही" हा मेसेज सगळीकडे गेला पाहिजे. मुंबई आज जी काही टिकली आहे निदान ती तशीच टिकवून ठेवायची असेल तर हे करणे आवश्यक आहे. पण ह्यासाठी लागणारा वेळ आणि इच्छाशक्ती आपल्याकडे नाही. मनोगतवर  फ़ुकट आणी मनात येईल ते वाट्टेल तस लिहीता येतं म्हणून हा प्रतिसाद.

मयुरेश वैद्य.