बाजे रे बाजे वाला ढोल तर मलाही कुठे दिसला नाही. छत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे. त्याच्या रुंद बुंध्यामध्ये असलेल्या पोकळ्यांना कदाचित हिंदीमध्ये ढोल म्हणत असावेत व त्यात गांधिलमाशांनी वस्ती केली असण्याची शक्यता आहे.