मिलिन्दपंत,
सुंदर गझल...
स्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की
कोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे
शाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?

हे दोन शेर फारच सुंदर झाले आहेत...  तुम्हांला शब्द कधीच दगा देत नाहीत!

अनंताचे इशारे आणि मर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ हा विरोधाभासही आवडला. मतलाही...

-(प्रभावित) कुमार

ता. क. 'होवून' आणि 'घेवून' यांच्या जागी (होणे आणि घेणे यांच्या रूपाप्रमाणे) 'होऊन' आणि 'घेऊन' हवं असं मला वाटतं.  एवढ्या सुंदर गझलेत ही छोटीशी त्रुटी राहायला नको असं वाटलं म्हणून मुद्दाम लिहितोय.