रोहिणी,

वर बहुतेकांनी लिहिले आहे त्याप्रमाणेच माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फटाके भावंडात वाटून घेण्यात, पुन्हा चार दिवसांसाठी त्यांची विभागणी करणं यात मजा यायची. आमच्याकडेही 'तसलं' बदक होतं. त्याची मन वळवून पंख उघडायला खूप गंमत वाटायची. 

ओरिसात दिवाळी एकच दिवस असते. ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. त्या दिवशी ते कालीपूजा करतात. इथली लक्ष्मीपूजा कोजागिरीच्या दिवशी असते. त्याच दिवशी आपल्याप्रमाणेच पहिल्या अपत्याला औक्षण, नवे कपडे वगैरे सर्व असते. त्या दिवसाला कुमार पूर्णिमा असेही म्हणतात.

---------

इतर बऱ्याच झाडांजवळ पणत्या लावत्यात पण तुळशीवृंदावनाशी पणती लावायला विसरलात! असो.