माझ्या मते शिवश्री आपलं मत मांडतात. त्यांचा विश्वास बोलून दाखवतात. त्यांचं बोललेलं १००% पटलं नाही तरी ते पोट तिडीकेनं लिहीतात, या बाबत दुमत नाही. मात्र वात कुक्कुट केवळ त्यांचं बिडंबन करतात. हा मुळ फरक दिसून येतो.
कुणाच्याही श्रद्धेची चेष्टा करणे वाईटच. म्हणून ज्यासाठी शिवश्रींना मी विरोध करतो त्याच कारणासाठी श्री वात कुक्कुट यांनासुद्धा येथे विरोध करतोय. तात्यांची खाद्यधर्म.. सुद्धा याच पठडीतील आहे असं वाटतं.
प्रशासक या दोहोंतील फरक जाणतील अशी आशा आहे.
नीलकांत