महाराष्ट्र शासनाने काय केले याने कुणीही विरोध करीत नाही. त्या विरोधामागे एक तर्क आहे.
जे उत्सव आमच्यावर विजयाचे म्हणजेच आमच्या पराजयाचे आहेत ते का साजरे करायचे असा त्यांचा सवाल.
उदाहरण घेऊ बलीप्रतिपदेचं - या दिवशी प्रजाहितदक्ष, शेतकऱ्यांचा राजा बळी याचा कपटाने घात करण्यात आला. कारण काय तर तो पुरोहित वर्गाला पुरेसं महत्त्व देत नव्हता, एवढंच. मग बळीराजाला आपला पुर्वज माननाऱ्यांनी हा सण का साजरा करावा? आजही शेतकरी वर्ग या दिवशी बळीला परत बोलावण्याची प्रार्थना करतो. बळीला पाताळात पाठवण्याचं समर्थन नाही करत. मात्र आपल्या आजच्या उत्सवात आम्ही साजरा करतो तो वामनाचा कपटी विजय. विद्रोही हे अमान्य करतात. आणि अश्या व्यक्तीला आपल्या दहा सर्वोच्च आदर्शांतही जागा देण्याला विरोध करतात.
नीलकांत