एकुणात वरपासून बरंच काही वाचल्यावर मला जाणवलेलं हे..

१. आजपर्यंत इतिहासात जे काही घडलं असं आपण मानत होतो त्यात एका गटाबद्दल जे काही चांगलं लिहिलं असेल ते सगळं आपण खोटं मानलं पाहिजे. तर आणि तरच आपल्याला जात न मानणारे म्हणता येईल. बर हे खोटं का मानलं पाहिजे म्हणजे हे खोटंच आहे याला पुरावा काय तर आम्ही म्हणतो म्हणून एवढंच उत्तर मिळतंय.

२. कुठल्याही तथकथित उच्चवर्णियाला स्वतःच्या परंपरांबद्दल आणि पूर्वजांबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर असणे चुकीचे आहे.

३. सर्व तथाकथित उच्चवर्णिय हे श्रीमंतीत लोळणारेच असतात आणि जर काही जण दरिद्री दिसत असतील तर ते केवळ सोंग असते. (म्हणजे दिवसातून एकच वेळ भाकरी आणि लाल तिखट खाऊन डॉक्टरेट मिळवणाऱ्या माझ्या आजोबांची संपत्ती कुठेतरी असणारच पुरून ठेवलेली. एवढी संपत्ती असूनही स्वतःचं हक्काचं घर त्यांना घेता आलं नाही हे पण ढोंगच नाही का?)

एवढ्या सगळ्यात विद्रोही साहित्य म्हणजे नक्की काय हा प्रश्न मात्र उत्पन्न झाला कारण वरील गोष्टींचा पुरस्कार करणारे म्हणजेच विद्रोही साहित्य असेल तर मग.. देवंच भलं करो... (अरे माफ करा देव म्हणणे हे हिंदू झाले नाही का..)