तुमची माणूस आणि सिंहाची गोष्ट परत माझाच मुद्दा पुढे नेते आहे. जिथे जिथे 'एका' समाजाबद्दलचे चांगले उल्लेख असतील तिथे तिथे ते ते खोडले पाहिजेत आणि असं करणारा हाच फक्त जातियवादी नसेल. थोडक्यात काय 'एका' समाजाला वाईट म्हणत रहाणे इथेच तुमची जातियवाद मिटवून टाकण्याची व्याख्या संपताना दिसतेय. याला केवळ सूडाचे गणित म्हणता येईल.

>>त्या परंपरा जर अन्यायकारक समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतील तर त्याविषयी आदर मानणे योग्य आहे का हे त्यांनीच ठरवणे योग्य आहे.<<

यामधे दोनतीन मुद्दे आहेत अर्थात मी तुमच्याविरोधी सूर लावलेला असल्याने तुम्हाला मुद्दे दिसणार नाहीत ती गोष्ट निराळी.
१. गृहितक हे की 'त्या' समाजाकडे एकही चांगली परंपरा नाही आणि त्या समाजाचा एकही पूर्वज आदर करण्याच्या लायकीचा नाही.
२. माणूस कितीही कसाही असला तरी अनेकदा त्याच्या स्वतःच्या मुलाबाळांकडे त्याच्या चांगल्या आठवणी असू शकतात आणि त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टीही (भौतिक नाहीत.. वळण स्वरूपातल्या). ह्याबद्दल 'त्या' समाजातील कुणीही कृतज्ञ असू नये काय?

>>हे वाक्य केवळ अभिनिवेशपूर्ण आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.<<
आपल्या बाजूची कुठलीच वाक्ये अभिनिवेशपूर्ण नसतात का? आणि आपल्यामते ही वस्तुस्थिती नाही का? आणि हो दारिद्र्यात राहून कसेबसे शिक्षण पूर्ण केलेल्या अनेकांची उदाहरणे माझ्या समाजातही आहेत. खरतर अशीच उदाहरणे जास्त देता येतील माझ्याही समाजात. हि डोळ्यासमोर असलेली उदाहरणे खोटी मानून सगळी संपत्ती माझ्या समाजाने तुमच्यापासून हिरावून घेतली आहे या वाक्यावर मी का आणि कसा विश्वास ठेवायचा?