विद्रोही साहित्यात सांगितलेला ईतिहास खरा आहे?
याचे उत्तर केवळ इतिहासतज्ञच देऊ शकतात आपण तुपण नाही कारण आपण आपल्या परिघात रहात असतो जिथून सर्व बाजूने वस्तू दिसेलच असे नाही. आणि हे दोन्ही बाजूंसाठी खरे आहे.

विद्रोही साहित्याने बहुजन समाज शहाणा होईल का ?
हे तळागाळात जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारले गेले पाहिजे. पण काही प्रमाणात हो असे म्हणायला हरकत नसावी. अर्थात सूडाचे राजकारण आणि मते यावर लक्ष केंद्रित करून या विद्रोही साहित्याचा आणि दलितांचाही वापर होताना आपल्याला दिसतो. त्यावर उपाय काय हे मात्र समजत नाही.

विद्रोही साहित्य संमेलनात एका विशिष्ट समाजाला लक्ष केल जात. अस का?
२ कारणं - इतिहासातले दाखले आणि राजकीय नेत्यांची सोय.

अशा साहित्याचि अथवा संमेलनाचि गरज आहे का ?
गरज मात्र नक्कीच आहे. फक्त स्वरूपाबद्दल विचार व्हायला हवा असे वाटते पण यावर मी जास्त काही बोलणे योग्य नाही.