रावसाहेब,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद, मात्र आपण पंत व डॉ. यांच्या अभिनयाबाबत जे लिहिले आहेत त्याच्याशी मी सहमत नाही. आपल्याला ते आवडणे वा नावडणे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. पण त्यांच्यावर केलेली टिका मात्र खचितच अन्याय्य आहे. आपण नामोल्लेख केलेल्या अभिनेत्यांनाही अनेक मर्यादा आहेत. अर्थात आपल्या त्यांच्यावरील प्रेमामुळे त्या आपल्याला जाणवत नसाव्यात. असो.

आपण एक स्वतंत्र चर्चा सुरू करून टप्प्या टप्प्याने पंत व डॉक्टर हे दोन अभिनेते, त्यांच्या काही भूमिका, त्यातला त्यांचा सुमार वा भिकार अभिनय तसेच ती भूमिका कुणी अधिक समर्थ्याने पेलली असती ते सविस्तर लिहा.

मनोगतींना अशी  चर्चा ही नक्कीच पर्वणी ठरेल, आणि अर्थातच माझ्यासह अनेक मनोगतींना त्यात सहभागी होता येइल. आपली समिक्षा या प्रतिसादाच्या चार ओळींपुरती मर्यादित न ठेवता माझ्या सूचनेचा विचार करावा ही विनंती.