विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हे खरं आहे आणि खुपच महत्त्वाचं आहे. आपल्या विचारांशी बांधील असल्यावर तसे विचार मांडायला हवेच. मात्र केवळ कुणाचा उपहास करायचा ही कसली बांधीलकी?
खेडूतराव , मी शिवश्रींच्या लिखाणाची वकिली करीत नाही. त्यांच्या लिखाणाला माझाही विरोध असतो. मात्र ते जे लिहीतात ते केवळ प्रतिसाद घेण्याकरीता किंवा उपहासात्मक नाही, तर ते स्वतः या विचारांत विश्वास ठेवतात.
सगळ्या महाराष्ट्रात असा थोडा तरुण वर्ग नक्कीच आहे ज्यांना या शिवधर्माने संभ्रम निर्माण केला आहे. या शिवधर्माच्या स्थापनेपुर्वीपासून त्यांना माझा विरोध राहिलेला आहे. तो चर्चा करुन मी कित्येकदा नोंदवला आहे. माझ्या अनेक मित्रांना मी या आवेशात बोलतांना पाहिलेलं आहे. मात्र मी जेव्हा त्यांना मुद्द्यांच्या आधारे बोलायला म्हटले तेव्हा ते कमी पडतात. मात्र एक लक्षात येतं की यांच्या भावना भडकवल्या जातात.
हे मात्र त्यात एकरुप होतात. शिवश्रींना जरी मी प्रत्यक्ष भेटलेलो नसलो तरी त्यांची अवस्था फार वेगळी नाही.
आणि हो चर्चा सुरु करुन नंतर प्रतिसाद न देने ही गैरजवाबदारपणाची कृती आहे अशी माझी सुद्धा तक्रार आहे.
तात्या , तुमच्यासारखाच माझाही मामला खुल्लमखुल्ला आहे हो! आवडलं तर आवडलं म्हणत डोक्यावर घ्यायचं, आणि नाही आवडलं तर निषेध नोंदवायचा, मात्र हा निषेध समोरच्याला बोलू देईल इतपत सौम्य असावा, इतकच.
तुमचा प्रतिसाद तेथे होता काय आणि नाही काय , यापेक्षा तुमच्याशी बोलायला अनेक विषय आहेत की.
नीलकांत