धन्यवाद, छू.
आंबेडकरांनी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. त्यातील काही मी वाचली आहेत. त्यात प्रस्थापित समाजव्यवस्था कशी निर्माण झाली असावी (अस्पृश्य मूळचे कोण..), ती अनेक संहितांची सरमिसळ कशी आहे (रिडल्स इन हिंदूइझम) अश्या विषयांवर भाष्य केले आहे. जे आहे ते कसे आहे, आणि का आहे हा त्या लिखाणाचा पाया आहे असे मला वाटते. ते कसे सुधारता येईल, तर शिक्षणाने, हे एकमेव (व माझ्यामते अगदी योग्य) उत्तर दिलेले आहे. यात 'विद्रोही' काय आहे?
म. फुल्यांची पुस्तके मी वाचलेली नाहीत.
उपऱ्या, उचल्या, झोंबी वगैरे पुस्तकातही वास्तव चित्रण आहे. त्यात व्यवस्थेविरूद्ध बंड असे काही दिसले नाही.
नेहमीच्या साहित्य संमेलनात ही पुस्तके मिळतात. तिथे त्यांच्या लेखकांना स्थान असतेच. शिवाय दलितेतर लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांत दैन्य, दुःख, संघर्षाचे वर्णन असू शकते. असते. तर मग विद्रोही साहित्याची वेगळी चूल का आहे? (ती तशी नसावी असे मला म्हणायचे नाही. केवळ आहे ते का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे.)