नीलकांत,
... तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या वागणुकीचंही समीक्षण करा आणि त्यांनी केलेल्या चुका टाळा. उगाच आपल्या वंशाचा आणि त्याच्या तथाकथित शुद्धीचा मिथ्या अभिमान बाळगू नका. 'ती' व्यवस्था चूक होती असं मनापासून मान्य करा, या देशावर आणि धर्मावर प्रेम करा....
आपण वर दिलेला संपूर्ण प्रतिसाद आवडला.
त्यामध्ये आपण 'गोब्राह्मण प्रतिपालक' याबद्दल आपले विचार लिहिले आहेत त्यावर मला काय वाटते ते लिहितो. मुघलांच्या आक्रमणामध्ये सर्व समाज पोळून निघत होता. धर्माचे विचार मांडणारे आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणारे असे जे ब्राह्मण लोक असतील त्यांवर सुद्धा त्यावेळी वाईट वेळ आलेली असणार. त्यांचे धर्मांतर, त्यांना बाटवण्याचे प्रकार म्हणजे सरळसरळ हिंदुधर्मावर झालेला (प्रतिकात्मक) हल्लाच असा तेंव्हाच्या लोकांचा समज असणार. शिवाय तो वर्ग लढण्यासाठीही दुर्बळ म्हणजेच ज्याची बरोबरी धर्माचे चिन्ह अश्या गायीशी होवू शकेल. त्यामुळे यवनांच्या आक्रमणात, त्यांच्या राज्यात गो आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाळ करणारा म्हणजे स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ अशा, (धर्मांतरामुळे) धोक्यात आलेल्या, धर्माचे रक्षण करणारा, असा याचा अर्थ असावा असे मला वाटत होते.
आपण वरील प्रतिसादात सामाजीक समरसतेसाठी विद्रोह करण्याऱ्यांची जी नावे घेतली आहेत, त्यामध्ये सामाजिक समरसता, कुठलाही गवगवा न करता, १९३५ साला पासून, प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या रा. स्व. संघाचे नाव दिसले नाही.
यावर आपली मते जाणून घ्यायला आवडतील.
आपलाच,
--लिखाळ.