लिखाळजी ,
परकीय आक्रमण जेव्हा झाले तेंव्हा साहजिकच धर्म पुरोहित वर्गाला त्याची सर्वात जास्त झळ बसली असेल. यात दुमत नाही. वर असलेला महाराजांचा उल्लेख हा एका पुरोहिताने आपल्या कसल्याश्या विनंतिवजा पत्रात केलेला आहे असं मी वाचून आहे.
मात्र बाबासाहेबांच्या जाणता राजाच्या शेवटच्या डोळेदिपवणाराऱ्या प्रसंगात ही घोषणा फार प्रकर्षाने जाणवते. कुणी शिवाजी महाराजांचे गुणगान कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र मला वैयक्तिक रित्या 'गो - ब्राम्हण' किंवा 'देवा- बामनाच्या साक्षीने' असा उल्लेख केलेला आवडत नाही. आणि महाराजांची अशी कुणालाच विशेष वागणूक नव्हती. म्हणून हा उल्लेख आवडला नाही. तसं नोंदवलं आहे. बाबासाहेब या पातळीवर विचार करतील असं नक्कीच नाही मात्र यातून एक संदेश जातोय हे मात्र नक्की.
आता संघ आणि समरसता. माझ्या माहितीप्रमाणे १९४० पर्यंततरी संघाचे प्रमुख उद्दिष्ट संपूर्ण भारतभर पोहोचण्याचेच केवळ होते. गुरुजींच्या काळात संघाचा विस्तार जनसंघ , अभाविप, आणि भारतीय मजदुर संघ अशा क्षेत्रात झाला.
सामाजिक समरसता हा विषय अग्रक्रमाने घेण्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांना. आणि हो मला विषय बदल करायचा नव्हता म्हणून मी कित्येक उदाहरणे आणि उल्लेख टाळलेत. त्यामागे कुठलाही दुसरा हेतू नाही. संघ आणि हिंदू समाज यावरही खूप काही बोलण्यालायक आहे. मात्र आजचा तो विषय नाही.
मी येथे लिहितोय ते माझ्या धर्मातील एका सकस परंपरेच्या पुनरुज्जीवनाबद्दल.
नीलकांत