कुणी शिवाजी महाराजांचे गुणगान कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र मला वैयक्तिक रित्या 'गो - ब्राम्हण' किंवा 'देवा- बामनाच्या साक्षीने' असा उल्लेख केलेला आवडत नाही.
'गो-ब्राह्मण'बद्दल सहमत, पण 'देवाब्राह्मणाच्या साक्षीने' या उल्लेखात काहीही जातीयवादी नाही.
लग्नाच्या संदर्भात हा उल्लेख ऐकलेला आहे. इतर शुभकार्ये / धार्मिक कार्ये / Official कार्ये (जसे राज्याभिषेक वगैरे) यांसंदर्भात हा उल्लेख वापरला जातो की नाही याबद्दल निश्चित कल्पना नाही; अधिक तपास करावा लागेल. शिवाजीमहाराजांच्या संदर्भात असा उल्लेख नेमका कोणत्या संदर्भात झाला याची कल्पना नाही. पण ते असो.
या वाक्प्रचारात 'ब्राह्मण' या शब्दाचा प्रयोग केवळ 'पुरोहित' अर्थात Officiating person एवढ्याच मर्यादित अर्थाने आहे. लग्न हे कायदेशीर आणि धार्मिकरीत्या वैध केव्हा ठरते, तर जेव्हा त्याला साक्षात आकाशस्थ परमेश्वराची आणि भूतलावरील संबंधित अधिकाऱ्याची* प्रत्यक्ष उपस्थितीने अधिकृत मान्यता असते. हा भूतलावरील संबंधित अधिकारी म्हणजे ब्राह्मण. ('ब्राह्मण लग्ने लावतो' किंवा '[केवळ] ब्राह्मण[च] लग्ने लावू शकतो' अशा अर्थाने नव्हे, तर 'लग्न लावणारा ब्राह्मण' अशा अर्थाने. प्रत्यक्षात समाजात याला जे '[केवळ] ब्राह्मण[च] - अर्थात एका विशिष्ट जातीतला पुरुष[च] - लग्ने लावू शकतो' असे स्वरूप आले आहे, ती एक समाजविकृती आहे. परंतु या वाक्प्रचाराच्या संदर्भात तो अर्थ अभिप्रेत नाही.)
कदाचित आजच्या जमान्यात याऐवजी '(देव मानत असाल तर) देवाच्या साक्षीने आणि रजिष्ट्राराच्या सहीशिक्क्याने' असा पर्यायी वाक्प्रचार वापरता येईल. (या संदर्भात रजिष्ट्रार हा ब्राह्मणाचे एक कार्य - function अशा अर्थाने - पार पाडत असल्यामुळे ब्राह्मणच. जन्ममृत्यूनोंदणीअधिकारीही ब्राह्मणच. शाळामास्तरही ब्राह्मणच. मग प्रचलित अर्थाने त्यांच्या जाती काहीही असल्या तरी. तसेच लष्करी शिपाई किंवा अधिकारी हे कोणत्याही जातीचे असले तरीही ते क्षत्रियच. War-like races हे एक थोतांड आहे. पण हे अवांतर झाले.)
इतर कार्यांच्या संदर्भातही असेच म्हणता येईल, आणि असे काही पर्यायी वाक्प्रचार (गरज पडल्यास बनवून) वापरता येतील.
परिस्थिती जशी बदलते तितक्या झपाट्याने भाषा बदलतेच, असे नाही. पण म्हणून मूळ भाषेत नेहमी काही आक्षेपार्ह असतेच, असेही नाही.
*लग्न वैध ठरण्यासाठी ('लग्नास कायदेशीर मान्यता असण्यासाठी' अशा अर्थाने) अशा कोणा पृथ्वीतलावरच्या अधिकाऱ्याची गरज मात्र निश्चित - मग तो अधिकारी म्हणजे धार्मिक पुरोहित असो, नाहीतर शासकीय रजिष्ट्रार असो. जुन्या हिंदी फिल्मी स्टाइलने परस्पर देवळात देवासमोर एकमेकांना हार घालून केलेल्या लग्नास मियाँ-बीवी (देवळात मियाँ-बीवी??????) राज़ी असतीलही कदाचित, पण कायदेशीर मान्यता निश्चितच नाही.
- टग्या.