वा खोडसाळपंत! आपण चक्क माझ्या पुंगीचे विडंबन केल्यामुळे मला उगाचच नीलहंस, प्रवासी वगैरे थोर पूर्वसूरींच्या पंक्तीला जेवून आल्यासारखे वाटायला लागले आहे. उगाचच मला गर्व होण्याची भीती आहे.
(हो. उद्या मी स्वतःला गज़लकार समजू लागले तर तो दोष कुणाचा? शिवाय साच्यात घालून पाडलेल्या आणि ठराविक हुकुमी मालमसाला असलेल्या माझ्या प्रत्येक प्रयत्नाला गज़ल म्हणवून घ्यायला लागले तर इथे केवढा अनर्थ माजेल?" )
बाकी आपले विडंबन आवडले. चित्तराव म्हणतात त्याप्रमाणे जमीनीतला बदल आवडला. फक्त ही पुंगी कोंबडीची कशी ते कळू शकले नाही. कोंबडीताईंची माफी मागून तुम्हाला विचारते की तुम्ही कोंबडी आहात का? किंवा कुक्कुटवंशी अगर कुक्कुटधर्मी लोकांशी आपले जवळचे नाते आहे काय?
(असे जाहीर लिहू नका हो... इथल्या कुक्कुटांची आणि वातकुक्कुटांची मनं दुखावतील ना... आता उद्या तुमच्यावर वातकुक्कुटांचा मोर्चा आला तर कुठल्या फांदीवर उडून जाणार तुम्ही?)
तरीही माझ्या तथाकथित गज़लेचे हे सुंदर रूपपरिवर्तन करून आपण मला जो बहुमान प्राप्त करून दिला आहे त्याबद्दल आपले आभार. विशेषतः शेवटची द्विपदी खूप आवडली. मला त्यात निवडणूक प्रचार अपेक्षित होता हे आपण अगदी अचूक ओळखलेत याबद्दलही आभार.
--अदिती