प्रस्तुत कालखंडात (सोळाव्या-सतराव्या शतकात) समाजावर ब्राह्मण मंडळींची चांगली पकड होती. कोणत्याही कृतीला धर्माची साथ आहे की नाही हे ब्राह्मणच ठरवणार. (आता हे बरोबर की चूक हा वेगळा मुद्दा आहे) लिहा-वाचायचे काम, चिटणीशी, कारखानविशी ब्राह्मणच करणार. मग अशा परिस्थितीत कोणत्याही नवोदित (शिवाजी महाराज) राज्यकर्त्याला ब्राह्मणांना जवळ करणे हे धोरणीपणाचेच वाटणार. कारण एक ब्राह्मण खूश असला तर तो अजून दहा व्यक्तींसमोर त्यांचे गुणगान करणार. ब्राह्मणांचे समाजात असलेले स्थान पहाता त्यांच्या शब्दाला नक्कीच जास्त किंमत होती.

'अश्या परिस्थितीत महाराजांनी स्वतःला गो-ब्राह्मण प्रतिपालक म्हणवून नाही घेतले तर ती त्यांची चूकच.' असे मी (पामर) म्हणावयास धजतो.